*पत्रकारांना कोरोनाकाळात विमा कवच द्यावे*
जिल्ह्यातील पत्रकारांची पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा, दि. १५ : इतर अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर पोलिस व कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकार देखील कोरोणा काळात सातत्याने काम करत आला आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना कोरोना काळात विमा कवच व इतर सुविधा देण्यात यावे अशी मागणी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित आदी उपस्थित होते. पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसात कोरोना संकट अधिक गडद झाल्याचे चित्र महाराष्ट्रासह देशात आहे. कोरोना काळात अगदी सुरुवातीपासून ‘कोविड योद्धा’ म्हणून पत्रकार सातत्याने फ्रंटवर काम करत आला आहे, करीत आहे. यामुळे अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील जवळपास अनेक पत्रकारांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी पत्रकार परिषदेने प्रत्येक रुग्णालयात पत्रकारांसाठी राखीव ठेवण्याची मागणी सुद्धा यापूर्वीच केलल आहे, तर शासनाने सरकारी डॉक्टर्स व पोलीस यांच्यासह पत्रकारांनासुद्धा 50 लाख रुपयांचे विमा कवच जाहीर केले होते. परंतु पत्रकारांसाठी त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही.
तरी पत्रकारांना विमा कवच यासह कोरोनासाठी ज्या अन्य सुविधा आहेत, त्या पुरविण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.
Please Like or subscribe on Youtube आज की खबर.