कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच

वाई व्यापारी महासंघाकडून सामाजिक बांधिलकी जपत कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले गेले, बरोबरच covid-19 च्या बचावासाठी प्रथमोपचार किट माफक दरात उपलब्ध करून दिले. Covid-19 चा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातीलच नव्हे तर इतर सर्व दगावलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली ही वाहण्यात आली.

वाई नगरपालिकेचे कर्मचारी गेली सहा महिने अहोरात्र झटत आहेत या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय वाई व्यापारी महासंघाने घेतला आणि त्यांची दोन लाखांची कॅशलेस पॉलिसी करण्याचा उद्देश ठेवून ती आज वितरण करण्यात आली. योगेश गाडे, पंकेश तनपुरे, उमेश कांबळे, राहुल गाडे, रवींद्र काळोखे, सुरेश काळोखे, वीरेंद्र कांबळे, रुपेश कांबळे, गणेश काळे, लखन काळोखे, सागर चौगुले, संदीप जावळेकर, रमेश रोकडे, बाळू कांबळे, अभिजीत मराठे, संजय जावळेकर, कुणाल कांबळे, रमेश काळोखे या सर्व कर्मचाऱ्यांना पॉलिसीचा लाभ मिळाल्याचे व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले.

काशिनाथ शेलार यांनी या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात वाई तालुक्यातील नागरिकांना तसेच वाईकरांना मदतीचा हात देणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्ती आणि संस्थांचे विशेष कौतुक केले. गेले दोन दिवस शहरात निर्जंतुकीकरनाच काम हातात घेऊन आज प्रथमोपचार किट आणि त्या २० कर्मचाऱ्यांना विमा कवच दिल्याबद्दल व्यापारी महासंघाचे आभार, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे यांच्या उपस्थितीत प्रथमोपचार किटचे लॉंचिंग करण्यात आले. हे किट घेतल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने दिवसातून किमान पाच वेळा ऑक्सिजन लेव्हल चेक करण्याचे आवाहन करत नितेश पोरे, शेखर शिंदे, भैय्या देशमाने, राहुल जायगुडे, प्रसाद महाडिक, गौरव जैन या व्यापारी महासंघातील टीमने पुढाकार घेऊन प्रथमोपचार किट साठी महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल सचिन फरांदे यांनी आभारही मानले.

वाई तालुक्यातील सर्व डॉक्टर, परिचारिका, आशाताई, वाई नगरपालिकेचे सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच इतर कर्मचारी, वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, वाई नगरपालिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक, किसनवीर कॉलेज, ज्ञानदीप कॉलेज आणि कोरोना संसर्ग कालावधीत नागरिकांसाठी ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे त्या सर्वांचे आभार अजित वनारसे यांनी मानले.

वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी व्ही काळे यांनी प्रथम वाई व्यापारी महासंघाचे धन्यवाद मानले पुढे बोलताना ते म्हणाले की वाईला भारतात दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. वाई तसे बुद्धिवंतांचे शहर जरी बुद्धिभेद झाला तरी संकटाच्या वेळी मात्र वाईकरांची होणारी एकजूट ही वाखाणण्याजोगी असते. संस्कार भारती, जैन समाज, बिल्डर असोसिएशनच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

वाई व्यापारी महासंघाकडून प्रत्येक कुटुंबासाठी covid-19 च्या बचावासाठी प्रथमोपचार किट माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले. सदर किटमध्ये ऑक्सीमीटर १, डिजिटल थर्मामीटर १, व्हेपोरायझर म्हणजेच वाफेचे मशीन १, विटामिन सी च्या गोळ्या 10, आयुर्वेदिक काढा 5 अशा एकूण सहा वस्तू उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. हे किट व्यापारी महासंघातर्फे ना नफा ना तोटा या तत्वावर फक्त 999 रुपयाला देण्यात येणार असल्याची माहिती प्रसाद माहिती त्यांनी दिली.

.

Please Like or subscribe on Youtube PRAGATI TIMES